भजनी मालिका
← भजनांकडे परत

भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे

bhar dekhoni vaishnavanche | dut palale yamache

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे ॥१॥ आले आले वैष्णववीर । काळ कांपती असुर ॥ध्रु.॥ गरुडटकयाच्या भारें । भूमी गर्जे जेजेकारें ॥ ।॥ तुका म्हणे काळ । पळे देखोनियां बळ ॥३॥