भजनी मालिका
← भजनांकडे परत

परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा

paraten mi ahen sahaj chi duri | vegalen bhikari namarupa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥१॥ न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ध्रु.॥ पडिलिये ठायीं उिच्छष्ट सेवावें । आरते तें चि देवें केलें ऐसें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही आम्हां जी वेगळे । केले ते निराळे द्विज देवा ॥३॥