भजनी मालिका
← भजनांकडे परत

पराधीन माझें करूनियां जीणें । सांडीं काय गुणें केली देवा

paradhin majhen karuniyan jinen | sandin kay gunen keli deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पराधीन माझें करूनियां जीणें । सांडीं काय गुणें केली देवा ॥१॥ उदार हे कीर्ति असे जगामाजी । कां तें ऐसें आजि पालटिलें ॥ध्रु.॥ आळवितों परी न पुरे चि रीग । उचित तो त्याग नाहीं तुम्हां ॥२॥ तुका म्हणे कां बा मुळीं च व्यालासी । ऐसें कां नेणसी पांडुरंगा ॥३॥