भजनी मालिका
← भजनांकडे परत

पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे

paraviya nari maulisaman | maniliya dhan kay veche

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥ न करितां परनिंदा द्रव्य अभिळास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥ बैसलिये ठायी म्हणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥२॥ संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥३॥ खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥४॥ तुका म्हणे देव जोडे याचसाठी । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥५॥