भजनी मालिका
← भजनांकडे परत

पत्राची वार्ता । शुभ ऐके जेवीं माता

patrachi varta | shubh aike jevin mata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पत्राची वार्ता । शुभ ऐके जेवीं माता ॥१॥ तैसें राहो माझें मन । गातां ऐकतां हरीगुण ॥ध्रु.॥ नादें लुब्ध झाला मृग । देह विसरला अंग ॥२॥ तुका म्हणे पाहे । कासवीचें पिलें माये ॥३॥