भजनी मालिका
← भजनांकडे परत

परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें सीस

parapurushachen sukh bhoge tari | utaroni karin ghyaven sis

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें सीस ॥१॥ संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥२॥ तुका म्हणे व्हावें तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई ॥३॥