भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचीच ओतली । मूर्ति याची ठसावली

sukhachich otali | murti yachi thasavali

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सुखाचीच ओतली । मूर्ति याची ठसावली ॥१॥ अविच्छिन्न भगवतबुध्दी । सर्वभूतीं निरवधी ॥२॥ मोह ममता कैंची आतां । आशा कल्पना हरिच्या भक्तां ॥३॥ निळा म्हणे सनकादिकां । अनुभव तैसा त्याचा निका ॥४॥