भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांभाळिलें बहुता ऐकिली प्रशंसा । तुम्ही जगदाधीशा युगायुगीं

sambhalilen bahuta aikili prashansa | tumhi jagadadhisha yugayugin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सांभाळिलें बहुता ऐकिली प्रशंसा । तुम्ही जगदाधीशा युगायुगीं ॥१॥ म्हणऊनियां आशे लागलों नेणता । बुडवूनि थितां संवसार ॥२॥ आतां माझी कोण करील बुझावण । तुम्ही उदासीन झाल्यावरी ॥३॥ कोणीये ब्रम्हांडीं रहिवास तुमचा । लाग माग त्याचा न पडे ठायीं ॥४॥ अंतरलों बहू दूरदूददेशीं । कोण सांगायासी येईल तेथें ॥५॥ निळा म्हणे माझें प्रारब्धचि खोटें । म्हणुनि वैकुंठें त्याग केला ॥६॥