भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

नेघों आम्ही कदा भुक्ति आणि मुक्ति । हरिनामीं विश्रांति सर्व जोडे ॥१॥ काय कराव्या त्या रिध्दी आणि सिध्दी । वाउग्या उपाधी भजना गोंवा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नेटकेंचि दैव उघडलें आजीं । तो हा मजमाजीं संचरला ॥१॥ आतां कैसें करुं मी यासी । नावरेंचि मनासी आवरितां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नेणे आपुल्या हितावरी । बोले त्यांसीचि विरुध्द करी ॥१॥ जाणावा तो जन्मांतर । पूर्व दोषाचा विकार ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नेणों काय पुर्वार्जित । होतें सुकृत निक्षेपिचें ॥१॥ तेंणें हातीं धरोनियां । संती ठाया पावविलों ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नेणों कांहीं तुम्ही आपुलियां सुखें । इतरांचि दु:खें पिडिति तें ॥१॥ यातना बहुवस संसारकाचणी । जाचति जाचणि जन्म जरा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नेत्र झांकविले ते हरी । कारण इतुलेंचि अभ्यंतरी । मज विराट झालियावरी । छळतील हे देखतां ॥१॥ तंव तें भावार्थी चोखडे । त्याणीं देखिलें तें निवाडें । मग नाचती कृष्णापुढें । कीर्ति त्याची वर्णित ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पडे आतां दिवसरातीं । विसर तुमचा श्रीपती । झाली इंद्रियां विश्रांति । रंगलीं नामचिंतनें ॥१॥ वदनीं सुंदर तुमचें नाम । डोळिया रुप मेघश्याम । श्रावणीं ऐकतां उत्तम । गुण तुमचे गोविंदा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा