भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणोनिया आपपर । होतें सुकर निक्षेपींचें

nenoniya apapar | hoten sukar nikshepinchen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नेणोनिया आपपर । होतें सुकर निक्षेपींचें ॥१॥ तेणें हातीं धरोनिया । संतीं ठाया पावविलों ॥२॥ विटेवरी दाविलें धन । होतें पोटाळून महर्षी ज्या ॥३॥ निळा म्हणे बैसला ध्यानीं । ज्याचिये चिंतनीं सदाशिव ॥४॥