भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेघों आम्ही कदा भुक्ति आणि मुक्ति । हरिनामीं विश्रांति सर्व जोडे

neghon amhi kada bhukti ani mukti | harinamin vishranti sarva jode

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नेघों आम्ही कदा भुक्ति आणि मुक्ति । हरिनामीं विश्रांति सर्व जोडे ॥१॥ काय कराव्या त्या रिध्दी आणि सिध्दी । वाउग्या उपाधी भजना गोंवा ॥२॥ नलभे आम्हां कांही मान्यता बहुमान । जेणें अभिमान खवळे अंगीं ॥३॥ निळा म्हणे दुरी दुरावूं जाणीव । नलगे शहाणीव नाडील ते ॥४॥