भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणोनि पारिखे । आत्मा आपणा न देखे

nenoni parikhe | atma apana na dekhe

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नेणोनि पारिखे । आत्मा आपणा न देखे ॥१॥ न देखोनि दुजें कांहीं । आपींआप असें पाहीं ॥२॥ नामा रुपा येणें । नाहीं होणें ना निमणें ॥३॥ निळा म्हणे नव्हे जागें । निजस्वप्न ना वाउगे ॥४॥