भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

नाहीं संदेह करी हा पाठ । पावसी वैकुंठ हरि म्हणतां ॥१॥ जैसे प्रल्हाद उपमन्यु धुरु । करितां नामोच्चारु वरिष्ठ पदीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाहींचि केलें समाधान । माझें म्हणवून क्षिती वाटे ॥१॥ आतां कधीं समोखाल । हातीं धरा प्रीतीनें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नाहींचि तुम्हां भीडचाड । येथें करुं अल्याति बडबड । कृष्ण माझा अवघ्यांसीं गोड । तुम्हांसी कां गे वीट याचा ॥१॥ जाऊं नेणेचि बाहेरी । तयावरी घालितां गे तुम्ही चोरी । आलगटा अवघ्याचि नारी । नसतींच गाहाणीं आणित्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नि:सीम भाव देखोनियां हरि । केली स्वीकारी पूजा त्याची ॥१॥ पत्र पुष्प तोय फल । घाली सकळ मुखींचि तें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निज सायासें जोडुनी । होतें निक्षेपुनी ठेविलें ॥१॥ तेंचि दिधलें माझया हातीं । आजीं संतीं कृपादान ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निजध्यास लागला मनीं । हाचि चिंतनीं दिवसरात्रीं ॥१॥ न सुटेचि करुं कैसें । लाविलें पिसें गोवळें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

निजात्मप्राप्तीलागीं सार । हरीचिया उच्चार नामाचा ॥१॥ हेंचि बीज हेंचि गुज । हेंचि निज निजाचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नित्य कथाश्रवणीं प्रीती । चित्तवृत्ति अर्थातरीं ॥१॥ तेचि आधिकारीं या सुखा । स्वानुभव निका पावती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नित्य नूतन तुम्ही नवे । आम्हीं तों जिवें वेंचतो ॥१॥ जाणें येणें आम्हा आटी । कल्पकोटीं तुम्हां जिणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नित्य वदनीं हरीचें नाम । अंतरीं प्रेम विसावलें ॥१॥ त्याच्या भाग्या नाहीं सीमा । पुरुषोत्तमा प्रिय झाले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नित्य श्रीहरीचें आठवितें गुण । वदनीं त्याचिया वो नामाचें स्मरण । ह्रदयीं धरुनियां निजभावें चरण । करीतें अनुदिनीं हेंचि अनुष्ठान वो ॥१॥ येथे आलिये वो याचि निजकार्या । केलीं कर्मे तीं अनुदिनी हेंचि अनुष्ठान वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नित्यानंदा पुढे आनंद तो कोण । विषयसुख बाई बापुडें तें क्षीण । जेथें न सरेची वैकुंठसदन । शेषशयी वो त्रिकुटभुवन वो ॥१॥ नेघों म्हणोनियां त्यागिती परौतें । घेऊं संगसुख हरीच्या सांगातें । गाऊं वानूं रुप पाहोनि निरुतें । हांसो खेळों ठायीं जेववूं सांगातें वों ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नित्यानंदे घोषें करितां हरीचें कीर्तन । श्रोते आणि वक्ते होती परम पावन ॥१॥ आणिकहि लोक तरती त्यांच्या सहवासें । भाळया भोळया भाविकांसी लाभ अनायासें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा