भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेदी करुं काज काम । स्मरवि नाम आपुलें

nedi karun kaj kam | smaravi nam apulen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नेदी करुं काज काम । स्मरवि नाम आपुलें ॥१॥ मागें पुढें उभाचि असे । लाविलें पिसें श्रीरगें ॥२॥ खातां जेवितां जवळिच रोहे । परताचि नोहे काय करुं ॥३॥ निळा म्हणे घातलि मिठी । आपणासाठीं मज केलीं ॥४॥