भजनी मालिका
← भजनांकडे परत

पडे आतां दिवसरातीं । विसर तुमचा श्रीपती । झाली इंद्रियां विश्रांति । रंगलीं नामचिंतनें

pade atan divasaratin | visar tumacha shripati | jhali indriyan vishranti | rangalin namachintanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पडे आतां दिवसरातीं । विसर तुमचा श्रीपती । झाली इंद्रियां विश्रांति । रंगलीं नामचिंतनें ॥१॥ वदनीं सुंदर तुमचें नाम । डोळिया रुप मेघश्याम । श्रावणीं ऐकतां उत्तम । गुण तुमचे गोविंदा ॥२॥ हातें वाजवितां टाळी । चरणें नृत्य कथाकाळीं । गोजिरें ध्यान हदयकमळीं । तेंचि ठसावोनि राहिलें ॥३॥ मस्तक म्हणे चरणांवरीं । माझा ठाव निरंतरीं । जिव्हा रंगली नामोच्चारीं । न राहे क्षणभरीं आठवितां ॥४॥ निळा म्हणे माझा हेत । होउनी ठेला मुद्रांकित । सदा सर्वदा गावें गीत । हेंचि चिंतूनि राहिला ॥५॥