भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणें मी परिहार । देऊं कोणासीं उत्तर

nenen mi parihar | deun konasin uttar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नेणें मी परिहार । देऊं कोणासीं उत्तर ॥१॥ म्हणोनियां हें खरें खोटें । ठेवा बांधोनियां मोटे ॥२॥ नेणोनियां तुमची गती । तंटा माझयाचि नांवे करिती ॥३॥ निळा म्हणे प्रत्युत्तर । मज तों न सुचे उत्तर ॥४॥