भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिहीं गाईलें हरिचे नाम । आतळों कर्म नेदी त्यां

jihin gailen hariche nam | atalon karma nedi tyan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जिहीं गाईलें हरिचे नाम । आतळों कर्म नेदी त्यां ॥१॥ जन्म जरा हरुनी व्याधी । बैसवी पदीं अपुलीया ॥२॥ ऐसा अगाध मिहिमा याचा । वर्णितां वाचा न पुरती ॥३॥ निळा म्हणे स्तवितां संतीं । अपार मती वेदांचिये ॥४॥