भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

जेणें रचियेलें भूगोळा । एकवीस स्वगें लावुनी माळा ॥१॥ तो हा विटे उभा ठेला । भक्तें पुंडलिकें पूजिला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेथूनियां येणेंचि नाहीं । फिरोनियां कांही संसारा ॥१॥ तया नांव परमपद । लाभती मृग्ध हरिनामें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेथें जेणें केला वास । तोचि वाटे त्यास निजग्राम ॥१॥ एरवीं सर्वहि भूमंडळ । आहें हें स्थळ याचेंचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जेववाल तेंचि जेवीन मुखें । पांघरवाल सुखें पाघरेन ॥१॥ बैसवाल तेथे बैसेन उगा । निजवाल जागा न सोडीं तो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जैशिया तैसा मिळोनियां । नेणवे म्हणोनियां कोणसी ॥१॥ गोडी साखर करितां भिन्न । वेगळी कैसेनि रुप धरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ज्या ज्या भक्तीं जेथें जेथें । पाचारिलें ज्या ज्या आर्थे । तुम्ही जाउनियां तेथें । साह्य केलें श्रीहरी ॥१॥ आर्तें गजेद्राचें स्तवन । ऐकतांचि पदाभिगमन । करुनियां त्याची अर्ति हरण । निजधामाप्रती पाठविला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ज्याचें अंतर तया ठावें । उमटेल बाहेरीं क्रियाभावें ॥१॥ म्हणोनियां धीर करा । माजिघरींचें येईल दारा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ज्याचे जैसे भाव तैशा त्या दाविती । स्वानुभव बोलती आपुलाल्या ॥१॥ परी तो एकला सकलांसीही पुरला । ज्याच्या परी झाला तैसा तेथें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ज्याचें देणें त्याचें नाम । गावें प्रेम धरुनियां ॥१॥ नाहीं तरी घडती दोष । अंगी नि:शेष कृतघ्रता॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ज्याचे मोक्षा मोक्षत्व देणें । मुक्तीसी स्थापणें मुक्तत्वीं ॥१॥ तो हा जगज्जनक मुरारी । उभा भीमातीरीं पंढरिये ॥२॥

रचनाकार: संत निळोबा