भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळे हेटि मेटी नाचे एकाचि पायावरी । धांवोनियां सिव आतां आत्मया श्रीहरि

khele heti meti nache ekachi payavari | dhanvoniyan siv atan atmaya shrihari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
खेळे हेटि मेटी नाचे एकाचि पायावरी । धांवोनियां सिव आतां आत्मया श्रीहरि ॥१॥ तरिच खेळ बरा रे । नाहिंतरी चेरा ॥२॥ धांवति तो पोरें पळतां धरि वेगावत । सारुनिया मागें गिती गाई भगवंत ॥३॥ निळा म्हणे चपळपणें करि कार्यसिध्दी । नाहीं तरी पोधा होता न पवसी कधीं ॥४॥