भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळ खेळ झेंपा गे आठवि चिद्रुपा । नाहिंतरि पुन:पुन्हां न चुकति खेपा

khel khel jhempa ge athavi chidrupa | nahintari pun:punhan na chukati khepa

रचनाकार: संत निळोबा · अभंग
खेळ खेळ झेंपा गे आठवि चिद्रुपा । नाहिंतरि पुन:पुन्हां न चुकति खेपा ॥१॥ घेंई बारवोटीं गे काढी सागरगोटी । जेणें अर्थ स्वार्थ परमार्थ पडे पोटीं ॥२॥ बरवि घालि झेंप गे लांबउनि हात । नाहिं तरी लाजोनियां आयुष्या करिसि घात ॥३॥ निळा म्हणे डोले गे हरीचिया तोलें । जेणें इहपरलोकीं विकसिल मोलें ॥४॥