भजनी मालिका
← भजनांकडे परत

खांबसूत्रीं खेळवीं दोरी । नाचती पुतळया दिसती वरी

khambasutrin khelavin dori | nachati putalaya disati vari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
खांबसूत्रीं खेळवीं दोरी । नाचती पुतळया दिसती वरी ॥१॥ तैसा बोलवी बोलतां । न दिसे परि तो मज आतौता ॥२॥ किनरी वाजे नानापरी । वाजवी त्याची ते कुसरी ॥३॥ निळा म्हणे तैसा माझा । वाच्यवाचकु सद्गुरुराजा ॥४॥