भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

एकी म्हणती हरि आमुचा सोयरा । दुजी म्हणे घरा पुसों जांई ॥१॥ तिजी म्हणे काली आणिला पोसणा । चौथी म्हणे कान्हा यशोदेचा कीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकी म्हणती हा आमुचा सांगाती । दुजी म्हणे परती भाऊ माझा ॥१॥ तीजी म्हणे हरि आमुचा मेहुणा । चौथी म्हणे पैसुन्या देखणी झणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकी म्हणे हरि आमुचा शेजारीं । दुजी म्हणे मित्र माझा ॥१॥ तिजी म्हणे सखा आमुचा जिवलग । चौथी म्हणे नि:संग सदांचा हा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकीं येकटेंचि असोनि एकला । विश्वीं विश्वाकार होऊनियां ठेला । जया परीवो तैसाचि गमला । नंदनंदन हा आचोल अंबुला वो ॥१॥ ऐशा गौळणी त्या बोलति परस्परीं । करुनि विस्मय आपुलाल्या अंतरीं । विश्वलाघवीया हाचि चराचरीं । नेणों महिमा यांसी म्हणों व्यभिचारी वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकींच नसतां एकपण दुजेपण कैचें । म्हणउनियां न चले कांही तेथें शब्दाचें ॥१॥ पहातें पहाणें जेथें विरमोनि जाय । घेणें देणें कैंचें तेथें सांगावे काय ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एक्या जिवें एक्या भावें । एकचि एकलें एक्या देवें ॥१॥ एकाएकीं एकचि झालें । एका अंगी विरोनी गेलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एवढासा माझा भाव तो कायी । तेवढाचि तुमचिये ठेविला पायीं ॥१॥ परी तुमचें अगाध देणें । जाणवलें यावरी उदारपणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐकतां श्रवणीं परमानंद । उपमर्दे कंद मायेचा ॥१॥ घोशगजरें गजें वाचा । जो श्रुतिशास्त्राचा गुह्यार्थ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐकिला तुमचा अगाध महिमा । दोषियां अधमां तारितसां ॥१॥ म्हणोनियां जी आलों शरण । सत्य मानूं संतवाणी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐकीं एकपणाचा घेउनियां त्रास । जाला नानाकार स्वरुपें बहुवस । म्हणोनि दुसरेंचि नाढळे वोयास । जयाततयामाजीं याचाचि रहिवास वो ॥१॥ ऐसे निजात्मया जाणोनि गोविंदा । जीवे भावें अनुसरल्या प्रमदा । करिती सेवावृत्ति निशिदिनी सदा । हसती रुसती करिती विनोदा वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐकोनी गजबजिली दैत्यसभा । धाकेंचि कंसही ठाकला उभा । तंव बीभत्सा माळभळभटाची शोभा । देखते झाले सकळही ॥१॥ नागवा उघडा आणि बोडका । जीवत्वपांगे बुडाली शंका । भोंवते देखताही विषयलोकां । म्हणे धांवा धांवा सोडवा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा