भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकोनियां हरिनाम घोष । पळती दोष दिगंता

ekoniyan harinam ghosh | palati dosh diganta

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एकोनियां हरिनाम घोष । पळती दोष दिगंता ॥१॥ जेंचि हनुमंताचिये हांके । कांपती धाकें निशाचरें ॥२॥ अथवा पडतांचि रविकिरण । जाय हरपोन अंधकार ॥३॥ निळा म्हणे घोकिलें जिहीं । घेतला तिहीं अनुभव हा ॥४॥