भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकी म्हणती हा आमुचा सांगाती । दुजी म्हणे परती भाऊ माझा

eki mhanati ha amucha sangati | duji mhane parati bhau majha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एकी म्हणती हा आमुचा सांगाती । दुजी म्हणे परती भाऊ माझा ॥१॥ तीजी म्हणे हरि आमुचा मेहुणा । चौथी म्हणे पैसुन्या देखणी झणें ॥२॥ एकी म्हणती हा आमुचा गोवळ । सहावी म्हणे बाळ नंदाचा कीं ॥३॥ निळा म्हणे जैशा श्रुती विवादती । तैशा या भांडती परस्परें ॥४॥