भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

उगेचि आतां बैसेन मी म्हणे । तंव हा करणें चेष्टवितों ॥१॥ दृष्टीपुढें हा उभाचि ठाये ऐकणें होउनी राहे श्रोत्रबिळीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उचित अनुचित आम्ही नेणों नेणतीं । सर्वोविशीं मूढचि मती विदीत असावें ॥१॥ म्हणोनियां आतां कृपादृष्टी अवलोका । वैकुंठनायका नका उपेक्षा करुं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उणें पुरें बोलिलों आधीं । तें आपुलिये बुध्दि सारिखें ॥१॥ तुम्ही तो देवा कृपामूर्ती । सकळां आर्ती पुरवितां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उत्तम अधम जया जे संगती । तैसी त्याचि मति फांकों लागें ॥१॥ सज्जना संगतीं धर्मक्रिया वाढे । पापीया आवडे पापबुध्दि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उत्तम संचित होतें गांठीं । तेणेंचि या भेटी संतांसवें ॥१॥ सुकृतासी आलीं फळें । भावबळें लगटोनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उत्तीर्ण त्यांचे काय व्हावें । न कळे भावें वंदितों ॥१॥ जीव पायीं ठेवूं म्हणे । लटिकेपणें तो मिथ्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उत्तीर्ण त्याचें नव्हिजे आतां । जिवही अर्पितां थोडाची ॥१॥ ओंवाळूनि सांडूं काया । वरुनी पायां संतांच्या ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उत्तीर्ण नव्हीजेची वेचतां जीवें । ऐसे बरवे उपकार याचे ॥१॥ सांगावें तें कोठवरी । जे जे अवसरीं जें केलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उदंडाचें धांवणे केलें । तुम्हीं तें ऐकिलें पुराणीं ॥१॥ म्हणोनियां विश्वास झाला । संतींही सांगितला बहुतांपरि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उदयीं उदय होतां कृपादृष्टी । स्वयें जगजेठी सेवा करी ॥१॥ सडा समार्जन स्वयें करी हरि । उदक तें भरी गंध घासी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उदार ऐसा न दिसेचि दृष्टि । पाहतांहि सृष्टी मज आतां ॥१॥ जयाचीया वचनें जीवा जीवपण । नुमसेचि शीवपण शिवा अंगीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उपरम झाला सर्वकाळ इंद्रियां । स्वरुपीं विलया मन गेलें ॥१॥ ऐशिया स्वानंदे बुझाविलें चित्त । राहिली अचिंत वदनीं वाचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा