भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकोनियां संतवाणी । चक्रपाणी संतोषे

ekoniyan santavani | chakrapani santoshe

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एकोनियां संतवाणी । चक्रपाणी संतोषे ॥१॥ म्हणे यारे भिऊं नका । माझिया सेवका भय नाहीं ॥२॥ नाम मुखीं न संडावें । भजा भावें संतोशीं ॥३॥ निळा म्हणे ऐसी हरी ।आज्ञा करी निजदासा ॥४॥