भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

ऐशा परि नमन माझें पंढरीनाथा । तूंचि होऊनि तुजमाजि झालों मी सरता ॥१॥ नये कळों कांहीं आतां एकानेक भाव । तुज माजीं मीहीं मजमाजि तूं सर्व ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐशिया सुखामाजीं राहेन सुखरुप । दुजा वागों नेदी आड येऊं संकल्प । भोगिन याचोंचि वो सर्वदा पडप । करुनि भावना अखंड तद्रूप वों ॥१॥ ऐशी ये निश्चयाची सांगितली मात । तुम्हीही आयका हो कृपावंत संत । नकळे माझा मज सत्याचा इत्यर्थ । तुम्हीचि दावाल तो मानीन हितार्थ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐशियाचे घरीं ऐसीचि मी सदा । न करुनी कांही धंदा सर्वहि करी ॥१॥ सदाचि निष्काम सदा मी मी सकाम । सद रुप नाम नूतन माझें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐशी अगाध चरित्रें याची । वर्णिता मागला शेष विरंची । लोक म्हणती हा सर्प बिलोंची । कैसेनि पां वांचला ॥१॥ मग त्या सांगे नारायण । यासी गेलें वर्ष होऊन । गोवळ वत्सें बहमसदन । पावोनि होते बैसले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐश्वर्याचीं वचनाक्षरें । वदती मधुरें तत्वदातीं ॥१॥ श्रवण करिती सात्विक लोक । पावती सुख कैवल्य ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसा चिंतावोनियां मनीं । म्हणे निमाली पूतना भगिनी । माझिया राज्या आली हानी । म्हणोनि माभळभट पाठविला ॥१॥ तंव पिढेदान त्या प्राप्त झालें । नवलचि हें अपूर्व ऐकिलें । येऊनि आम्हातें जाणविले । नव्हें बाळ हें तान्हुलें श्रीहरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसा दोहीं स्थ्‍ळींचा महिमा । अगाध उपमा नाहीं त्या ॥१॥ पंचक्रोशीमाजी भार । छबिने अपार मिरवती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसा निळा नित्यानंदी निमग्न केला । देऊनियां नामस्मरण चरणीं स्थापिला ॥१॥ तेणें ब्रम्हानंदे गर्जे नाम वैखरी । आठवूनि रुप तुमचें हदयमंदिरीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसा बहुत काळ क्रमिला क्षेत्रांत । मग धरिला पृथ्वी हेत पलाटणीं ॥१॥ उत्तरदक्षीण मानस करावें । तीर्थां अवलोकावें आणि क्षेत्रां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसिया बेगडी नका गोवूं आम्हांसी । अनुसरलों सेवेसी तुमचे नामचिंतनी ॥१॥ नाना मतांतरें त्यांचे अर्थ विपरीत । नेऊनियां घालित मुखीं काळाचे सर्व ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसिये सांपडलों संदीं । सर्वदा व्दंव्दीं काळाचे ॥१॥ कैसी सुटका होईल आतां । न लक्षेचि सत्ता कर्मगती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसींचि देखिलीं उंदडें । जळो त्यांची काळीं तोंडें ॥१॥ मुखें सांगती परमार्थ । स्वार्थ अंतरी अनर्थ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा