भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकींच नसतां एकपण दुजेपण कैचें । म्हणउनियां न चले कांही तेथें शब्दाचें

ekinch nasatan ekapan dujepan kaichen | mhanauniyan na chale kanhi tethen shabdachen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एकींच नसतां एकपण दुजेपण कैचें । म्हणउनियां न चले कांही तेथें शब्दाचें ॥१॥ पहातें पहाणें जेथें विरमोनि जाय । घेणें देणें कैंचें तेथें सांगावे काय ॥२॥ दृश्याचि नाहीं द्रष्टत्वाचा फिटला पांग । काया वाचा मनचि नाहीं धारणा योग ॥३॥ निळा म्हणे जेथें सुख सुखपणा नये । निजानंदी निजानंद हारपले ठाय ॥४॥