भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनि संत हांसतील । तुम्हांसी येईल मग लाज

aikoni sant hansatil | tumhansi yeil mag laj

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐकोनि संत हांसतील । तुम्हांसी येईल मग लाज ॥१॥ कौल दिला राहे सुखें । न म्हणो मुखें दे ऐसें ॥२॥ मागावें तें आम्हांचि जवळी । आहे नामावळीं पढों सुखें ॥३॥ आणिखी तुमची नाहीं आशा । ठेवा कैशा मुक्तिहि त्या ॥४॥ निळा म्हणे आपुल्याचि सुखें । असों हरिखें अखंडित ॥५॥