भजनी मालिका
← भजनांकडे परत

विप्र वेष तेव्हां घेऊनि निघाला । गोकुळासी आला लागवेगें

vipra vesh tevhan gheuni nighala | gokulasi ala lagavegen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विप्र वेष तेव्हां घेऊनि निघाला । गोकुळासी आला लागवेगें ॥१॥ पुत्रोत्सव कोठें लोकांला पुसत । भावीत सांगत नंदाघरीं ॥२॥ ऐकोनियां ऐसें आला अकस्मात । येशोदा देखत सन्मुख त्या ॥३॥ श्रीकृष्णासी तेव्हां वोसांगीं घेतलें । दंडवत केलें ब्राह्मणासीं ॥४॥ सन्मुख बैसोनि वर्तमान पुसे । बाळाचें या कैसें चिन्ह सांगा ॥५॥ पंचांग त्या वेळीं टाकिलें कपटासी । मान तुकावोनि पाहातसे ॥६॥ नामा ह्मणे मैंदें पंचांग पाहून । यशोदा लाऊन बोलतसे ॥७॥