भजनी मालिका
← भजनांकडे परत

विरंचीचा बाप क्षीरसागरवासी । ध्याती योगी त्यासी निरंतर

viranchicha bap kshirasagaravasi | dhyati yogi tyasi nirantar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विरंचीचा बाप क्षीरसागरवासी । ध्याती योगी त्यासी निरंतर ॥१॥ परेहूनिपर वैखरीहूनि दुरी । कौसल्येचे उदरीं तोचि असे ॥२॥ बोलियेले जें जें नव्हे असत्य वाणी । न येऊं दे मनीं शंका कांहीं ॥३॥ माझें हें संचित धन्य धन्य आतां । पाहीन मीं कांता लक्षुमीच्या ॥४॥ धन्य धन्य धन्य अयोध्येचे लोक । वैकुंठ-नायक पाहातील ॥५॥ धन्य पशूपक्षी श्वापदें तरुवर । राजा रघु-वीर पाहातील ॥६॥ त्रैलोक्यांत धन्य तूंचि एक नृपा । नाम-याच्या बापा पाहाशील ॥७॥