भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

येईं वो अच्युते नामामृत रसे । सुंदर डोळसे जा-न्हवीये ॥१॥ अमृताची खोटी अच्युतनाम पेठीं । पावे वो जगजेठी अच्युतसार ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं वो अनिरुद्धे सांबळें प्रबुद्धे । बिराटे गोविंदे दाव वेगीं ॥१॥ त्राहे माउलीये मना तुझी सोय । चुकती अपाय नाम घेतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येई वो कृपावंते अनाथांचे नाथे । निवारीं भवव्यथे पांडुरंगे ॥१॥ मी बाळक भुकाळु तूं माउली कृपाळु । करीं माझा सांभाळु पंढरिराया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं वो केसरी नरसिंह उच्चारी । पवित्र साचारी तिहीं लोकीं ॥१॥ नरसिंह वामन प्रल्हाद रक्षण । आमुचें तें धन नाम तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं वो तूं कृष्णे हरी माझिये तृष्णे । दिननिशीं प्रष्णे वाट पाहें ॥१॥ त्राहे कृष्णगंगे सावळे सारंगे । नामस्मरण वेगें पुरे आम्हां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं वो त्रिविक्रमे पूर्ण पान्हा देईं । कामधेनु होईं विठ्ठलराजे ॥१॥ त्रिविक्रम धरे येईं तूं सांवळे । मुकुंद गोपाळे के-शवे वेगीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं वो दामोदरे पवित्र हे करे । मना हो नावरे प्रेमलोट ॥१॥ पाहें कृपादृष्टी साहे जगजेठी । पूर्ण पान्हा घोठी ऐसें करीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं वो पद्मनामे पंकजलोचने । विश्व पूर्णघने देखे तुज ॥१॥ त्राहें पद्मनाभा वाचा सिद्ध पावे । मज हें बुगवे माया-जाळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं वो वामने खुजीयखुजटे । पंढरीचे पेठे उभी राहें ॥१॥ येईं वो डोळसे सांवळे तेजसे। वामने बहु बसे ब्रह्मचारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येई वो विठ्ठले मजलागीं झडकरी । बुडतों भवसागरीं काढी मज ॥१॥ आकांत आवसरी स्मरलीसे गजेंद्रें । दीनानाथ ब्रीदें साच केलीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं वो श्रीधरे सर्व रूपसारे । कैवल्य उतरे अभिनव ॥१॥ श्रीधर श्रीरंगे नाम पांडुरंगे । प्रगट वो सांगे पूर्णधन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येई हो विठ्ठले भक्तजनवत्सले । करुणा कल्लोळे पांडुरंगे ॥१॥ सजलजलदघन पीतांबर परिधान । येई उद्धरणें केशिराजे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं ह्लषिकेशी दिव्यरूप दिसे । मन हें उल्हासे भेटी-लागीं ॥१॥ ह्लषिकेशी नामें तरले संभ्रमें । नित्य रामनामें भवसिंधू ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईंगे माधवे पाजीं प्रेमपान्हा । विषयाचा आंदणा नको करूं ॥१॥ धांव तूं मधुकरे माधवे उदारे । येईं तूं सोइरे जन-निये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईंवो अधोक्षजे वैकुंठ विराजे । नाम गे सहजे अमृतरासी ॥१॥ अधोक्षज नामें घालीन गोंधळ । रिता एक पळ जाऊं नेदी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येंईवो विठ्ठले माते माउलीये । निढळावरी कर ठेऊनि वाट मी पाहें ॥१॥ येतियास पुसें जात्या निरोप । पंढरपुरीं माझा मायबाप ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येउनि आळंकावती केला क्षेत्रवास । देऊनी चित्तास समाधान ॥१॥ नित्य हरिकथा नामसंकीर्तन । संतांचे दरुशन सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव