भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं वो दामोदरे पवित्र हे करे । मना हो नावरे प्रेमलोट

yein vo damodare pavitra he kare | mana ho navare premalot

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं वो दामोदरे पवित्र हे करे । मना हो नावरे प्रेमलोट ॥१॥ पाहें कृपादृष्टी साहे जगजेठी । पूर्ण पान्हा घोठी ऐसें करीं ॥२॥ दामोदरे नाम मदन परिकरे । हाचि वो विचार मनें केला ॥३॥ येईं तूं निर्धारें पावें तूं झडकरी । येईं वो लवकरी दामोदरे ॥४॥ दामोदर माता पाहे वो समता । पावे वो निवांता पावे वेगीं ॥५॥ नामा म्हणे लोटूं प्रेमामृत निवटूं । नामेंच वैकुंठु दामोदर ॥६॥