भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

रखुमाई म्हणे ऐकतां जी ताता । संन्यास घ्यावा आतां म्हणताती ॥१॥ संतती वांचूनि न घ्यावा संन्यास । ऐसें सांगावें त्यांस म्हणितलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रमासिंधुमाजी सौंदर्याची धणी । ब्रीदें चक्रपाणि मिरविती ॥१॥ मेघदेहाकृति घनःश्याम मूर्ति । नटतसे भक्तीं भक्तजना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रमेच्या वल्लभें देखियेलें कंसा । धरोनी आवेशा बैसलासे ॥१॥ त्वरें जाऊनियां धरीयेला केशीं । पाडियेला भूमिसी दुष्टबुद्धी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राईयेवढें पांखरूं त्रिभुवनीं त्याचा फेरारे । नर आणि नारी तया पांखराचा चारारे । पिंडामध्यें आहे त्याचा शोध तुझी करारे । मेरूच्या शिखरीं त्या पांखराचा थारारे ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

रांजण गांवामध्यें संताजी पवार । असे तो सरदार नामांकित ॥१॥ स्वामी काजामध्यें असे तो सावध । भावें हा गोविंद आठवीत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राजयासी सर्व वृत्तांत ठाउका । असोनी बाळका पाही नातो ॥१॥ कामीक जगासी कामचि आवडे । स्त्रीमोहानें वेडे झाले बहु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राजा म्हणे बाळा देतों पंच ग्राम । तो म्हणे आत्माराम देता आहे ॥१॥ आशा सांडोनियां निराश जाहला । शरण देवाला जावयासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राजा ह्मणे इच्छा तुझिये मानसीं । डोहळे मजसीं सांग आतां ॥१॥ येरी ह्मणे ऐसें वाटतसे जीवा । कनिष्ठासी द्यावा राज्य-पट ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राजाई तें पुसे अहो नामयाला । करा जेवायला कांहीं यासीं ॥१॥ प्रातःकाळीं घरीं सारूनि भोजन । आले ते चालून माझे भेटी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राजियाची कन्या नाम मिराबाई । विठोबाचे पायीं रत सदा ॥१॥ मायबाप तिचे करिती कृष्णसेवा । आवडीनें देवा पूजिताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राज्यीं स्थापियेला उग्रसेन तेव्हां । देवकी वसुदेवा सोडविलें ॥१॥ देवकीच्या स्तनीं फुटलासे पान्हा । वसुदेव द-र्शना करीतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रात्रंदिवस खंती वाटे माझे जीवीं । अनुदिनीं आठवीं चरण तुझे ॥१॥ ने रे पांडुरंगा आपुलिया गांवा । तूं माझा विसावा जिवलग ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राधा वनींच्या पुत्रास धन बहुत झालें । तो म्हणे आतां धर्म करीन । बापाचिया श्राद्धा आवंतिले ब्राम्हण । एक जेवण सदामाचें ॥१॥ कैसी नागवण आलीरे बापा । वेंचा परतें पाप आणिक नाहीं ॥ध्रु०॥

रचनाकार: संत नामदेव

राधेप्रती अनया बोले तयेवेळीं । घरांत एकली अससी तूं ॥१॥ एकलें हें तुज कर्मेना मंदिरीं । खेळावया हरी आणीत जाईं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राम मंत्राचिया आवर्ती । घडती जयासी पुढतोपुढती । त्याचा जन्म धन्य ये क्षितीं । सर्व कुळाशीं तारक ॥१॥

रचनाकार: संत नामदेव