भजनी मालिका
← भजनांकडे परत

येई वो विठ्ठले मजलागीं झडकरी । बुडतों भवसागरीं काढी मज

yei vo viththale majalagin jhadakari | budaton bhavasagarin kadhi maj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येई वो विठ्ठले मजलागीं झडकरी । बुडतों भवसागरीं काढी मज ॥१॥ आकांत आवसरी स्मरलीसे गजेंद्रें । दीनानाथ ब्रीदें साच केलीं ॥२॥ स्मरलीसे संकटीं द्रौपदी वनवासी । धांवोनि आलीसी लवडसवडी ॥३॥ प्रल्हादें तुजलागीं स्मरिलें निर्वाणीं । संकटापासोनि राखियेलें ॥४॥ नामा म्हणे थोर पीडिलों भर्भवासें । अखंड पाह्तुसे वाट तुझी ॥५॥