भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं वो श्रीधरे सर्व रूपसारे । कैवल्य उतरे अभिनव

yein vo shridhare sarva rupasare | kaivalya utare abhinav

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं वो श्रीधरे सर्व रूपसारे । कैवल्य उतरे अभिनव ॥१॥ श्रीधर श्रीरंगे नाम पांडुरंगे । प्रगट वो सांगे पूर्णधन ॥२॥ श्रीकरे श्रीधरे शोभा ते साचारे । चक्रांकित करे शंख तुझा ॥३॥ सुंदर श्यामळ नाम हें अधळ । मुखीं हो वेल्हाळ हस्त तुझे ॥४॥ प्रकाशे हा पूर्ण श्रीधरे पैं जाण । सांगितली खूण खेचरामें ॥५॥ नामा ह्मणे माता श्रीधर उच्चारू । तरेन साचारू तिन्ही लोकीं ॥६॥