भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं वो अनिरुद्धे सांबळें प्रबुद्धे । बिराटे गोविंदे दाव वेगीं

yein vo aniruddhe sambalen prabuddhe | birate govinde dav vegin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं वो अनिरुद्धे सांबळें प्रबुद्धे । बिराटे गोविंदे दाव वेगीं ॥१॥ त्राहे माउलीये मना तुझी सोय । चुकती अपाय नाम घेतां ॥२॥ अनिरुद्ध् पाठे जाईन वैकुंठे । पुंडलीक पेठे उभा असे ॥३॥ कटावरी कर सांवळी सुंदर । मनाचा विचार इच्या चरणीं ॥४॥ अनिरुद्धसार अनु नाहीं आधार । सर्वही विचार अनिरुद्धे ॥५॥ नामा म्हणे येईं अनिरुद्धे माये । आणिक उपाय न लगे मज ॥६॥