भजनी मालिका
← भजनांकडे परत

येंईवो विठ्ठले माते माउलीये । निढळावरी कर ठेऊनि वाट मी पाहें

yenivo viththale mate mauliye | nidhalavari kar theuni vat mi pahen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येंईवो विठ्ठले माते माउलीये । निढळावरी कर ठेऊनि वाट मी पाहें ॥१॥ येतियास पुसें जात्या निरोप । पंढरपुरीं माझा मायबाप ॥२॥ पितांबार शेला कैसा गगनीं झळकला । गरुडावरी बैसूनि माझा कैवारी आला ॥३॥ विठोबाचें राज्य आह्मां नित्य दिवाळी । विष्णुदास नामा जिवेंभावें ओंवाळी ॥४॥