भजनी मालिका
← भजनांकडे परत

करावया वनभोजन । जाती गोकुळींचे जन

karavaya vanabhojan | jati gokulinche jan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
करावया वनभोजन । जाती गोकुळींचे जन ॥१॥ भोजन करिती । कोणी देवा खेळविती ॥२॥ डोळे झांकीत श्रीपती । दवी निद्नेची आकृती ॥३॥ बहुत खेळलासे खेळा । आतां निजवागे बाळा ॥४॥ वस्त्रें घालुनी शकटातळीं । निजविती वनमाळी ॥५॥ क्षणक्षण निजला देव । रडे उठे वासुदेव ॥६॥ मुलालागीं ह्मणे तेव्हां ।माझा कान्होबा खेळवा ॥७॥ रागेंरागें झाडी लात । गाडा मोडोनी पाडीत ॥८॥ नामा ह्मणे वाटी धन । नंद वांचला नंदन ॥९॥