भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसेम भक्त जेवुनि धाले । समस्त पांतिकरु उठिले

aisem bhakta jevuni dhale | samasta pantikaru uthile

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसेम भक्त जेवुनि धाले । समस्त पांतिकरु उठिले । गोपाळें विडे दिधले । आपुलेनि करकमळें ॥१॥ धन्य धन्य तें भोजन । धन्य धन्य तें निधान । धन्य धन्य तो वृक्ष अज्ञान । धन्य नारायन आळंकापुरी ॥२॥ विठ्ठलें दिधलें वचन । यांसी घाला रे आसन । तंव उद्धवें आपण । समस्तां बैसकार दिधले ॥३॥ पूजिलें गंधाक्षता लावुनि । टिळे उटी कर्पुर चंदनीं । ऐसे तिये वैकुंठभुवनीं । वैष्णवांसी पूजी हरी ॥४॥ तंव म्हणे रुक्मिणी । नामा आणा बुझावुनि । आपलेनि हातें चक्रपाणि । त्यासी घांस घालावे ॥५॥ ऐसें सांगताम हरीसी । बुझाविती नामयासी । तो स्फुंदत उकसा बुकसीं । मग चहूंकरीं उचलिला ॥६॥ सवेम संतांचा मेळा । तयामाजीं परब्रह्म पुतळा । नामा बुझावोनी तत्काळा । देहावरी आणिला ॥७॥ तंव विस्तारुनी आणिलें ताट । माजी षड्रस अन्ने बरवंट । रुक्मिणी आणि जेथें वैकुंठ । भक्तांसहित उभे असती ॥८॥ नामयातें संबोखोनि हरि । बैसविला मांडियेवरी । कवळ घ्यावचा मुख पसरी । निजकरें हरी घालितसे ॥९॥ नामा आनंदें डुलत । तृप्त जाला प्रेमें ओसंडत । सकाळ संतां कवळ देत । आपुलेनि निजकरें ॥१०॥