भजनी मालिका
← भजनांकडे परत

करावें सार्थक रखुमाईनें तेव्हां । आरंभिली सेवा अश्वत्थाची

karaven sarthak rakhumainen tevhan | arambhili seva ashvatthachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
करावें सार्थक रखुमाईनें तेव्हां । आरंभिली सेवा अश्वत्थाची ॥१॥ जाणोनी पैं देवें उग्र अनुष्ठान । तेथें जालें येणें श्रीपादाचें ॥२॥ देखोनि सत्पात्र केला नमस्कार । सारांश उत्तर बोलियेलें ॥३॥ पुत्रवती होई दिधला आसीर्वाद । रखुमाईसी विनोद वाटियेला ॥४॥ माते तूं हांससी श्रीपाद पुसती । स्वामी पुत्र कैसे होती पतीविण ॥५॥ भ्रतारें जाऊनी घेतला संन्यास । स्वामीचे वचनास वचनास नलगे बोल ॥६॥ पुसतां खाणखूण निश्चयो बाणला । श्रीपाद बोलिला सत्य सत्य ॥७॥ रखुमाईसी पुसे असे तुझें कोणी । येरी कर जोडोनी बोलियेली ॥८॥