भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

वाऊगाची सोस करितोसी तूं मना । चिंती तुं चरणां विठोबाच्या ॥१॥ अविनाश सुख देईल सर्वदा । वाचे वदा सदा रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वाचे म्हणा रामनाम । तेणें निवारे क्रोध काम । संसाराचा श्रम । नुरे कांहीं तिळमात्र ॥१॥ न लगे वेदविधि आचार । सोपा मंत्राचा उच्चार । अबद्ध अथवा शुचि साचार । राम म्हणा सादर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वांझचिया बाळा बागुलें ग्रासिलें । तैसे मिथ्या देह कळिकाळें ग्रासिलें ॥१॥ नेणा नवलावो जाणा ब्रह्माभावो । देहींचा संभव समूळ मिथ्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वायां वायां शिणती साधक जन । साधक तितुकें ज्ञानघन । साध्य साधन मानितां भिन्न । निजात्मा पुर्ण नव्हती ॥१॥ साखरेवेगळी पाहतां गोडी । पाहे म्हणती ते बुद्धि कुडी । साखर अवघी गोड धाकुडी । आत्मा निरवडी जग तैसें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वायां शब्दज्ञान बोलावा गौरव पोटींचा पैं भाव मिथ्या सोंग ॥१॥ मैंदाचिया परी बेसती ध्यानस्थ । सदां चित्त ओढत परधनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वायांचि कासया करितां आटाआटी झणें पाडा तुटी संसारासी ॥१॥ संसार कर्दमीं गुंतलेली बापा । किती वेळां खेपा कराव्या त्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वायांचि भुली पडली गव्हारा । भ्रमली भोंवरा संसारींच्या ॥१॥ कां रे सावध न होशी मूढा । शिणशी दगडा फजितखोरा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वायांची सोस संसार कामाचा । रामनामीं वाचा रंगी कां रे ॥१॥ यापरती जीवा सोडवण नाहीं । वेदशास्त्रीं पाहीं भाष्य असे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वायांविण करुं नये बोभाट । सांपडली वाट सरळ आम्हां ॥१॥ आतां नाहीं भय तत्त्वतां । ठेविला माथा चरणावरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ