भजनी मालिका
← भजनांकडे परत

वांझचिया बाळा बागुलें ग्रासिलें । तैसे मिथ्या देह कळिकाळें ग्रासिलें

vanjhachiya bala bagulen grasilen | taise mithya deh kalikalen grasilen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वांझचिया बाळा बागुलें ग्रासिलें । तैसे मिथ्या देह कळिकाळें ग्रासिलें ॥१॥ नेणा नवलावो जाणा ब्रह्माभावो । देहींचा संभव समूळ मिथ्या ॥२॥ जळगार पाषाण तें जैसें जीवन । साकार देह तैसा ब्रह्मार्पण ॥३॥ एका जनार्दन एकत्व पाहीं । देहविदेह समुळ तेथे नाहीं ॥४॥