भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

विठ्ठल नाम घेती वाहाती टाळिया । ब्रह्मादिक येऊनियां वंदिती पायां ॥१॥ धन्य धन्य हरिभक्त जगीं । वाहाताती टाळी नाचताती रंगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विठ्ठल पंढरपुर निवासी । विठ्ठल उभा भिवरेसी । विठ्ठल पुंडलिकापाशीं । भक्ति प्रेमेशीं तिष्ठत ॥१॥ जाई जाई मना तेथें । सुखें वैष्णव नाचती जेथें । ब्रह्मानंदपद दरुशनमात्रें । देत आहे भक्तांसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विठ्ठल म्हणतां विठ्ठलाचि होसी । संदेह येविशीं धरुं नको ॥१॥ सागरीं उठती नाना पईं तरंग । सिंधु तो अभंग विठ्ठल एक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विठ्ठल रुक्मिणी राहीं सत्यभामा एकरुपी परमात्मा पंढरीये ॥१॥ कैवल्य उघडें क्षीरसागर निवासी । तपें पुंडलिकासे वश्य जाहिलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विठ्ठल विठ्ठल वदतां वाचे । स्वरुप त्यांचे ठसांवे ॥१॥ हा तो अनुभवा अनुभव । निरसे भेव काळांचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विठ्ठल सांवळा पंढरीये उभा । धन्य त्यांची शोभा सोभतसे ॥१॥ पुंडलिका मागें कर ठेवुनी कटीं । समपाय विटीं देखियेला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान । नाहीं आम्हां चिंतन दुजियांचे ॥१॥ आमुचे कुळींचे विठ्ठल दैवत । कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विठ्ठलासी गाय विठ्ठलासी ध्याय । विठ्ठलासी पाहे वेळोवेळां ॥१॥ विठ्ठल विसावा सोडवला जीवां । म्हणोनि त्याच्या गांवा जावें आधीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विदेहदेह विस्मृति पावले । देहादेहीं फिटलें द्वैताद्वैत ॥१॥ ऐसें जनार्दनें उघड दाविलें । देहींच आटलें देहपण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विधिनिषेध धरितां मनीं । सहजें कार्य होय हानीं ॥१॥ जें जें वेळे जें जें घडे । विधिनिषेध सर्व जोडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विधियुक्त नोहे संध्यास्नान । तेणें घडें पतन कल्पकोटी ॥१॥ रेचक पूरक कुंभक ब्रहाटक । प्राणायाम देखन साधेचि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विधियुक्त पाणिग्रहण पैं जाहलें । जामातालागीं वहिलें काय बोले ॥१॥ तुम्ही हरिभक्त दुजा नाहीं भाव । चालवा गौरव उभयतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विपरीत अर्थ ऐकतां कानीं । पुरुष गाभणी स्त्रीचेनि चिंतनीं ॥१॥ नवल गे माय नवल गे गाय । तीन पोरें व्याला सांगुं काय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विपरीत सुपरीत हा तो काळाचा विभाग । तेथें त्याग भोग करूनी काय ॥१॥ होणार तें होतें आपुलें न चले कांहीं । वायां दुःख पाहीं मानू नये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विरहिणी विरहा विरहित बोले । कां वो पुर्वकर्म आड ठेलें । वाचें न येती नाम सावळें । तया विरहा मन माझें वेधलें ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

विवाद वाद हें तो अधम लक्षण । भक्तीचें कारण न साधे येणे ॥१॥ मुख्य एक करी एकविधपण । सम दरुशनें देखें जगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विवेक कांडणीं कांडितें साजणी । निजबोध स्मरणी फिरतसे ॥१॥ देह हें उखळ मन हें मुसळ । काडिलें तांदुळ विवेकाचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ