भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

मीही संतचरण वंदीतसे माथां । वेदादि साम्यता थोडी तेथें ॥१॥ पुराणासी धाड पडलें सांकडे । शास्त्रांचें तें कोडे उगवेल ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ । सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती ॥१॥ जगाच्या उध्दारा तुमचा अवतार । पावन हे साचार मूढ जन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मुख सुंदर मंडित साजिरा । विंझणे वारिती राहिरखुमाई सुदरां ॥१॥ नवल वो हरी देखिला डोळां । पाहतां पाहतां मन विरालें अबळा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मुखीं नाम वदे करें वाहे टाळी । कीर्तनाचे मेळीं सद्रदित ॥१॥ भक्ताचा महिमा वाढवी श्रीपती । कीर्तनीं गोरियाप्रती कर आले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मुखीं नाही निंदा स्तुती । साधु वरिती आत्मस्थिती ॥१॥ राग द्वेष समुळ गेले । द्वैताद्वैत हारपलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मुख्य आदिनाथ प्रणवाचें निज । पार्वतीतें बीज उपदेशिलें ॥१॥ सनकसनदंन अत्रि कपिलमुनी । नारदादि शिरोमणी भक्तराज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मुद्रा ती पाचवी लाऊनियां लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥१॥ कानीं जें पेरिलें डोळां तें उगवले । व्यापलें भरिलें तोचिक हरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मुरली धरुनी अधरीं । वाजवीं छंदें नानापरी । भोवतें गोपाळ नाचती गुजरीं । यमुनातीरी आनंदें ॥ तो हा नंदनंदन गे माये । त्याचा वेध लागला मज सये । कांहीं केलीया तो न राहें । नाठवे देह गेह गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मुळीच निर्विकार ब्रह्मा तें निश्चळ । त्यामाजीं चंचळ अहंस्फूर्ति ॥१॥ तेचि ज्ञप्तीकळा चिन्मात्र स्वरुप । तो हरी संकल्प पुरातन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ