भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुखीं नाम वदे करें वाहे टाळी । कीर्तनाचे मेळीं सद्रदित

mukhin nam vade karen vahe tali | kirtanache melin sadradit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुखीं नाम वदे करें वाहे टाळी । कीर्तनाचे मेळीं सद्रदित ॥१॥ भक्ताचा महिमा वाढवी श्रीपती । कीर्तनीं गोरियाप्रती कर आले ॥२॥ टाळी पिटूनियां नामाचा उच्चार । करीत साचार गोरा तेव्हां ॥३॥ एका जनार्दनीं पुरला मनोरथ । मूलही कीर्तनांत देखियेलें ॥४॥