भजनी मालिका
← भजनांकडे परत

मीही संतचरण वंदीतसे माथां । वेदादि साम्यता थोडी तेथें

mihi santacharan vanditase mathan | vedadi samyata thodi tethen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मीही संतचरण वंदीतसे माथां । वेदादि साम्यता थोडी तेथें ॥१॥ पुराणासी धाड पडलें सांकडे । शास्त्रांचें तें कोडे उगवेल ॥२॥ अहं ब्रह्मा ऐशा श्रुति वेवादती । नेति त्या म्हणती तटस्थ ठेल्या ॥३॥ उपासनामार्ग परंपरा जाला । तो बोध तुला सांगितला ॥४॥ एका जनार्दनीं संतांचा सांगत । न चुको देऊं हित आपुलें तूं ॥५॥