भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुखीं नाही निंदा स्तुती । साधु वरिती आत्मस्थिती

mukhin nahi ninda stuti | sadhu variti atmasthiti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुखीं नाही निंदा स्तुती । साधु वरिती आत्मस्थिती ॥१॥ राग द्वेष समुळ गेले । द्वैताद्वैत हारपलें ॥२॥ घेणे देणें हा पसारा । नाहीं जयासी दुसरा ॥३॥ एका जनार्दनीं संत । ज्याचे हृदयीं भगवंत ॥४॥