भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुद्रा ती पाचवी लाऊनियां लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे

mudra ti pachavi launiyan laksha | to atma pratyaksha hari dise

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुद्रा ती पाचवी लाऊनियां लक्ष । तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे ॥१॥ कानीं जें पेरिलें डोळां तें उगवले । व्यापलें भरिलें तोचिक हरी ॥२॥ कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले । हरिपाठी आले सर्व मार्ग ॥३॥ नित्य प्रेमभावें हरिपाठ गाय । हरिकृपा होय तयावरी ॥४॥ झाला हरिपाठ बोलणें येथुनी । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥