भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुख सुंदर मंडित साजिरा । विंझणे वारिती राहिरखुमाई सुदरां

mukh sundar mandit sajira | vinjhane variti rahirakhumai sudaran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मुख सुंदर मंडित साजिरा । विंझणे वारिती राहिरखुमाई सुदरां ॥१॥ नवल वो हरी देखिला डोळां । पाहतां पाहतां मन विरालें अबळा ॥२॥ नेणें तहान भूक लज्जा अपमान । वेधिलें देवकीनंदनें गे माय ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां मुख । मुख पाहतां अवघें विसरलों दुःख ॥४॥